शिवरायाचे निधन कधी झाले?www.marathihelp.com

शिवरायाचे निधन कधी झाले?
छत्रपती शिवरायांचे निधन स्वराज्याची राजधानी रायगड येथे रौद्र संवत्सर शके १६०२ , चैत्र शुद्ध पोर्णिमा , शनिवार ३ एप्रिल १६८० रोजी झाले.


छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम थोडक्यात खाली दिलेला आहे-

शोध - सव॔प्रथम भारतीय नौदलाचा शोध.
१९ फेब्रुवारी १६३० - शिवाजी महाराज यांचा जन्म.
१९ मार्च १६३७ - जिजाऊंनी शिवाजींना पुणे येथे आणले.
१६ मे १६४० - शिवाजी व सईबाई निंबाळकर यांचा विवाह.
२७ एप्रिल १६४५ - किल्ले रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ.
२८ जानेवारी १६४५ - स्त्रियांची अब्रू लुटणाऱ्या गुजर पाटलाला कडक शासन.
७ मार्च १६४७ - कानंद खोऱ्यातील तोरणा किल्ला जिंकुन स्वराज्याचे तोरण उभारले.
इ.स. १६४७ - कोंढाण्यावर विजय.मुरुंबदेवाचा डोंगर जिंकुन त्याचे नाव राजगड ठेवले.
इ.स. १६४८ - पुरंदर किल्ला जिंकला.
इ.स. १६४९ - जिंजी येथून शहाजी रावांची व कान्होजी जेधेंची सुटका
इ.स. १६५६ - त्यांचे जेष्ठ बंधू संभाजीराजे यांचे कनकगिरी येथे तोफेचा गोळा लागुन निधन.
३० एप्रिल १६५७ - जुन्नर या ठाण्यावर छापा.पुष्कळ मालमत्ता हस्तगत.
१४ मे १६५७ - महाराणी सईबाईच्या पोटी शंभूराजांचा जन्म.
२४ ऑक्टोबर १६५७ - दुर्गाडी किल्ल्याची पायाभरणी. अपार द्रव्यसाठा सापडला.पुरंदरचे किल्लेदार नेताजी पालकर यांना सरसेनापती पदावर बढती.
५ मार्च १६५९ - ३०० होनात पोर्तुगालची तलवार विकत घेतली.
५ सप्टेंबर १६५९ - पत्नी सईबाईंचे निधन
१० नोव्हेंबर १६५९ - अफजलखान वध.
२ मार्च १६६० - सिद्धीचा पन्हाळगडास वेढा
५ एपिल १६६३ - पुण्याच्या लालमहालावर छापा.
२३ जानेवारी १६६४ - शहाजी महाराजांचे कर्नाटकात होदीगरे येथे निधन.
१४ एप्रिल १६६५ - पुरंदरची लढाई
१३ जून १६६५ - पुरंदरचा तह
४ फेब्रुवारी १६७० - गड आला पण सिंह गेला
६ मार्च १६७३ - कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळा फत्ते केला.
२४ फेब्रुवारी १६७० -सोयराबाईच्या पोटी राजाराम यांचा जन्म
६ जून १६७४ - शिवरायांचा राज्याभिषेक
१७ जून १६७४ - जिजाऊंचे निधन वयाचे ७७व्या वर्षी
२४ सप्टेंबर १६७४ - शाक्य पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा दूसरा राज्याभिषेक
३ एप्रिल १६८० - शिवरायांचे निधन

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 10:01 ( 1 year ago) 5 Answer 5974 +22