kullu Manali Touring Place In India 2021 | कुल्लू मनाली – भारतातील पर्यटन ठिकाण

kullu Manali Touring Place In India 2021 | कुल्लू मनाली – भारतातील पर्यटन ठिकाण

kullu Manali Touring Place In India 2021

आपला भारत देश खरोखरच विविधतेने नटलेला आहे. निसर्गाने मुक्तहस्ताने भारताला वरदान दिलेले आहे. भारतातील चित्तवेधक,डोळ्यांची पारणे फेडणारे पर्यटन स्थळे बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. कुल्लू मनाली (kullu Manali Touring Place In India 2021 | कुल्लू मनाली – भारतातील पर्यटन ठिकाण) हे एक असेच पर्यटन स्थळ आहे ज्याकडे पर्यटक आकर्षित होतात.

kullu Manali Touring Place In India 2021

कुल्लू आणि मनाली हे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेली दोन हील स्टेशन आहे.  पर्यटकांच्या सर्वात जास्त आवडीचे भारतातील हे थंड हवेचे ठिकाण आहे. भारताच्या हिमाचल प्रदेशातील कुल्लू या जिल्ह्यात मनाली हे हील स्टेशन आहे. मनाली ब्यास नदीच्या तीरी वसलेले असून ते समुद्रसपाटीपासुन 6725 फुट उंचीवर आहे.

निसर्गाचे वरदान लाभलेल्या कुल्लू मनाली बाबत :

कुल्लू हे नयनरम्य ठिकाणे , दऱ्या आणि मंदिरे या साठी प्रसिद्ध आहे. तर मनाली हे खळखळणाऱ्या नद्या बर्फाच्छदित पहाड आणि साहसी खेळ या साठी प्रसिद्ध आहे. कुल्लू मनाली ला सर्वत्र बर्फाच्छादित शिखरे, खोल दऱ्या, सतत वाहणाऱ्या खळखळनाऱ्या नद्या आपला मानसिक थकवा नक्कीच पळवून लावतात.

मनाली हे मुळात तीन जवळच्या पहाड यांचा संग्रह आहे. या प्रत्येक पहाडात एक गाव आणि एक मंदिर आहे.

वसंत ऋतूत कुल्लू मनाली ही बहरून जाते. येथे असणारी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या फुलांनी हा परिसर खुलून दिसतो. या फुलांमुळे तेथील दृष्य अप्रतिम दिसते. त्यासोबतच रोडेड्रॉन फुलें ही त्यामध्ये भर टाकतात.

शरद ऋतूत वर निळे आकाश आणि बर्फाच्छादित शिखरे सर्वत्र पसरलेली हिरवळ, उंच देवदार वृक्ष तर डोळ्यांची पारणे फेडणारी आहेत.

कुल्लुला देवतांचा देश असेही म्हणतात. येथील सर्व परिसर हा जंगल , दऱ्या , नदी – नाले , फळबागा , बर्फाच्छादित शिखरे यांनी वेढलेला आहे.

असे म्हटले जाते की मनाली शहराचे नाव हे मनू च्या नावावरून पडले आहे. मनुचे निवासस्थान ते मनाली होय. जेव्हा जल प्रलय आला त्यावेळी मनू आपल्या जहाजावरुन येथेच उतरला होता. जुन्या मनालीमध्ये मनूला समर्पित एक प्राचीन मंदिर आहे.

मनाली आणि त्याजवळचा परिसर भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा परिसर सप्तर्षिचा वास्तव्याचा होता असे म्हटले जाते.

मनालीचे हवामान थंड आणि आल्हाद दायक आहे. पर्यटक या ठिकाणी साहसी खेळांचा आनंद घेतात. या खेळांमध्ये मुख्यतः स्कीइंग, हाईकिंग ( लांब पायदळ यात्रा) , गिर्यारोहन, पैराग्लायडिंग, राफ्टिंग,ट्रेकिंग, कायाकिंग, आणि माउंटन बाय किंग या खेळांचा आनंद पर्यटक या ठिकाणी घेतात. योक स्किइंग या ठिकाणचा एक वेगळाच खेळ आहे. एक्स्ट्रीम याक स्पोर्ट्स मुळे मनालीला टाईम मॅगझिन मध्ये आशियातील सर्वश्रेष्ठ असे चित्रित केले आहे.

मनालीला पाहण्यासारखी ठिकाणे :

मनीकरन साहिब :

येथे एक प्राचीन मंदिर आहे. त्याच सोबत एक गुरुद्वारा मनीकरन साहिब आहे. हे स्थळ कुल्लू पासून 45 की.मी. लांब तर मनाली पासून 85 की.मी. लांब आहे.

एका पौराणिक कथेनुसार पार्वती मातेच्या कानाचा हरवलेला झुमका याठिकाणी सापडला होता. त्यामुळे या ठिकाणचे नाव मनीकरन असे पडले.

कुल्लू मनालीला असलेल्या पार्वती नदीचे पाणी बर्फाप्रमाणे थंड तर असतेच शिवाय बाजूला गरम पाणी सुद्धा आहे. हा एक चमत्कारच आहे. येथे येणारे पर्यटक या गरम पाण्यात आंघोळ करतात. या पाण्यात आंघोळ केल्याने अनेक आजार बरे होतात असे म्हटले जाते. हे पाणी एवढे गरम असते की त्या पाण्यात दाळ आणि तांदूळ शिजविला जातो.

नागर किल्ला :

नागर किल्ला हा मनालीच्या दक्षिण भागात आहे.हा किल्ला पाल साम्राज्याचे प्रतीक आहे. या किल्ल्याचे रूपांतर हॉटेल मध्ये केले गेले आहे.

हिडिंबा देवी मंदिर :

महाभारतातील भीमाची पत्नी हिडिंबा हीचे मंदिर याठिकाणी आहे. हे मंदिर 1553 मध्ये बांधण्यात आले असे सांगण्यात येते. हिडिंबा देवी ही स्थानिक लोकांची देवी आहे. हे मंदिर चार मजली आहे. या मंदिराच्या बाहेरील भागावर सुंदर कलाकृती केलेली आहे.

रहला झरणें :

हे रहला झरणें मनाली पासून 27 कि.मी. लांब आहेत. रोहतांग मार्गावरील चढावर सुरुवातीलाच रहला झरणें लागतात. हे रहला झरणें 8205 फूट ( 2501मी.) उंचीवर आहेत. हे सौंदर्य पाहून मन मंत्रमुग्ध होऊन जाते.

सोलांग घाटी :

सोलांग घाटी हा मनालीतील एक लोकप्रिय प्रेक्षणीय पॉइंट आहे. हा स्नो पॉइंट आहे. मनाली पासून 13 की.मी. लांब असलेला पॉइंट पर्यटकांचा आवडता पॉइंट आहे.

कसोल :

पार्वती घाटी वर असलेले कसोल हे एक छोटेसे गाव आहे.हे गाव बाईकिंग , ट्रेकिंग या सारख्या साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे.

पार्वती घाटी :

पार्वती घाटी हे आणखी एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. या पार्वती घाटीत विविध वनस्पती, फुलें आहेत. त्याशिवाय येथे खूप मोठ्या प्रमाणात झरणे आहेत. त्यामुळे येथे आल्यावर मरगळ झटकून आपण ताजेतवाने होतो.

भृगू झील :

प्रेक्षणीय स्थळ रोहतांगच्या पूर्व दिशेला आणि पिर पंजाल पर्वत रांगेत असलेल्या गुलाबा गावाजवळ भृगू झील आहे. असे म्हटले जाते की पुरातन काळात प्रसिद्ध ऋषी भृगू या ठिकाणी ध्यान धारणा करीत होते. त्यामुळेच या ठिकाणचे नाव भृगू झील असे पडले. येथील दृष्य अप्रतिम आहे. आपल्या डोळ्यांची पारणे फेडणारी आहेत. याचा अनुभव तेथे गेल्याशिवाय येणार नाही.

कुल्लूला बघण्यासारखी ठिकाणे :

कुल्लू ला सर्वत्र प्राकृतिक सौंदर्य पसरलेले आहे. कुल्लू ला कोठेही गेलो तर मन मंत्रमुग्ध च होईल. जिकडे बघावे तिकडे निसर्गाने मुक्तहस्ताने प्राकृतिक सौंदर्याची उधळण केली आहे.

kullu Manali Touring Place In India 2021

या ठिकाणी उरुसवती हिमालय लोक कला संग्रहालय आहे. त्याचसोबत शांबला बौद्ध थंगचे कला संग्रहालय पाहण्यासारखे आहे.

येथे काली बाडी मंदिर,रघुनाथ मंदिर, बिजली महादेरू मंदिर आणि वैष्णव देवी मंदिर बघण्यासारखी आहेत.

मनालीला कसे जाता येईल ?

रोड मार्गे :

राष्ट्रीय महामार्ग 3 द्वारे मनाली हे दिल्लीला जोडलेले आहे. हा महामार्ग पुढे लेह पर्यंत जातो. जगातील सर्वात उंचीवरील हा महामार्ग आहे. चंदीगड पासूनही लक्झरी बसेस आणि टॅक्सी उपलब्ध आहेत.

रेल्वे मार्ग :

कुल्लू मनालीच्या जवळ असलेले रेल्वे स्टेशन चंदीगड,शिमला,जोगिंदर नगर हे आहेत.

 

हवाई मार्ग :

मनाली पासून सर्वात जवळचे विमानतळ भुंतुर हे आहे. भूंतुर मनाली पासून सुमारे 50 की.मी. लांब आहे तर कुल्लू पासून 10 की.मी.लांब आहे. आता अलीकडे किंगफिशर  रेड दिल्ली वरून मनाली करिता हवाई सेवा सुरू करण्यात आली आहे. एअर इंडिया आठवड्यातून दोनदा मनाली करिता हवाई सेवा देते.

मनालीला गेल्यावर कोठे मुक्काम करायचा ?

मनालीला गेल्यावर मुक्काम करायचा असेल तर भरपूर सुविधा उपलब्ध आहेत. पर्यटक आपल्या सोई नुसार हॉटेल निवडू शकतो. खाली काही हॉटेल्स ची नावे दिली आहेत.

हॉटेल मनाल्सू, एच पी टी डी सी लॉग हट्स, सरवरी कुल्लू,हॉटेल कैसला नग्गर, हॉटेल कुंजम मनाली त्याचसोबत मनाली हटस, या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी हॉटेल्स बाबत माहिती घ्यायची असेल तर तुम्ही मनाली ला असलेल्या पर्यटन केंद्राशी संपर्क साधून माहिती घेऊ शकता.

मनालीचे तापमान कसे असते ?

मनालीचे तापमान किती असते हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल. मनालीचे तापमान उन्हाळ्यातही उन्हाळ्यात कमाल तापमान 26 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 12 डिग्री सेल्सिअस असते. हिवाळ्यात कमाल तापमान 12 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान शून्य पेक्षा कमी होत असते

कुल्लू मनालीला भेट केव्हा द्यावी ?

कुल्लू मनाली हे खरोखरच पृथ्वीवरील स्वर्ग आहे. येथील निसर्ग आपल्याला नक्कीच आवडेल. दैनंदिन जीवनात आलेला कंटाळा, मरगळ या ठिकाणी आल्यावर नक्कीच निघून जाईल. आपल्या जीवनात नवा उत्साह आल्याखेरीज राहणार नाही.

तसे आपण वर्षभरात केव्हाही कुल्लू मनालीला भेट देऊ शकतो. परंतु काही पर्यटन स्थळे वर्षात काही काळ भेट देण्या योग्य नसतात. कारण जेव्हा बर्फ पडायला सुरुवात होते तेव्हा काही ठिकाणी जाणे धोक्याचे असते. त्यामुळे कुल्लू मनालीला भेट देण्यासाठी सर्वात योग्य वेळ ही जानेवारी ते जून हीच आहे. साहसी पर्यटक इतर वेळीही जावू शकतात.

कुल्लू मनालीला तुम्ही नक्कीच स्वर्गीय आनंद घ्याल यात शंका नाही.

तुम्हाला आमचा kullu Manali Touring Place In India 2021 हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्ही आमच्या http://www. historicaltouch.com या वेबसाईटला भेट देऊ शकता.

स्रोत : google

1 thought on “kullu Manali Touring Place In India 2021 | कुल्लू मनाली – भारतातील पर्यटन ठिकाण”

Leave a Comment