Gahu Lagavad 2021 | गहुची लागवड कशी करावी?

Gahu Lagavad 2021 | गहुची लागवड कशी करावी?

Gahu Lagavad 2021

गहू (Gahu Lagavad 2021) हे भारतातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. तांदुळाच्या खालोखाल भारतात गव्हाच्या उत्पादन केले जाते. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून भारताने गव्हाच्या उत्पादनात अमेरिकेलाही मागे टाकले आहे. सध्या भारत गहू उत्पादनात स्वयंपूर्ण होऊन जगाला गहू निर्यात देखील करू लागला आहे. भारतात पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश ही प्रमुख गहू उत्पादक राज्ये आहेत. आपल्या महाराष्ट्रातही गव्हाचे उत्पादन वाढत आहे.

गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी आपल्याला नक्कीच आवश्यक ती माहिती जाणून घेणे आवश्यक असते. गव्हाच्या पिकासाठी जमीन केव्हा तयार करावी? प्रत्यक्ष गव्हाची लागवड कधी आणि केव्हा करावी? गव्हाचे कोणते वाण वापरावे? कोणते खत आणि रसायने वापरावी? अशाच प्रकारे इतरही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या बद्दल माहिती जाणून घेणे आवश्यक ठरते.

गव्हाच्या पिकासाठी जमीन कशी असावी? गव्हाची पेरणी कधी करावी?

गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असावी. जर जमीन ही हलकी वा मध्यम दर्जाची असेल तर आपल्याला भरपूर भरखते टाकण्याची गरज पडते.

कोरडवाहू शेतीत गव्हाची पेरणी करायची असेल तर ती जमीन ओलावा धरून ठेवणारी असावी.कोरडवाहू जमिनीत साधारणतः ऑक्टोबर महिन्यात तिसऱ्या आठवड्यात गव्हाच्या पेरणीस सुरुवात करू शकतो.

ओलिताच्या शेतात गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

गहू पेरण्यासाठी जमीन तयार करून घ्यावी. जमिनीची आंतर मशागत व्यवस्थित करून घ्यावी.

पेरणी शक्यतोवर पाबरीच्या साह्याने करावी. जर ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करायची असेल तर पेरणी यंत्राला खत देण्याची व्यवस्था असावी.त्यामुळे पेरणीसोबताच रासायनिक खताचा पहिला डोज देता येईल.

जर तुम्हाला गव्हाचे भरघोस पीक घ्यायचे असेल तर तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे की,हेक्टरी गव्हाच्या झाडांची संख्या सुमारे वीस लाखांच्या आसपास असावी.त्यासाठी आपण पेरणी साठी एकरी सुमारे पन्नास ते साठ किलो बियाणे घ्यावे. कोरडवाहू करिता एकरी सरासरी तीस किलो बियाणे चालतील.

गव्हाचे प्रसिद्ध आणि सुधारित वाण :

कोरडवाहू साठी खालील वाण वापरल्या जातात.

1. एन 59

2. एमएसीएस 1967

3. एनआय 4539

4. एकेएडडब्लू 2997 – 16 (शरद)

बागायती साठी खालील वाण वापरल्या जातात.

1. एच डी 2380

2. एमएसीएस 2496

3. एचडी 2189

4 पूर्णा ( एकेएडब्लू 1079)

5. एमएसीएस 2846

6.एकेएडब्लू 3722 (विमल)

कृषी तज्ञांच्या मते गव्हाच्या कल्याण सोना,लोकवन आणि सोनालिका या वाणास तांबोरा हा रोग लवकर लागतो. त्यामुळे या वाणांचा वापर शेतकऱ्यांनी करू नये.

बीजप्रक्रिया कशी करावी?

शेतकऱ्यांनी कॅप्टन किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्याच बरोबर 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर आणि 250 ग्रॅम पीएसबी प्रति 10 किलो बियाण्यास चोळावे. या जिवाणू संवर्धक मुळे उत्पादनात 10 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा करता येते.

पेरणी कशी करावी ?

जमिनीत पुरेशी ओल आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. पेरणी दक्षिणोत्तर केल्यास उत्तम. ओलिती शेतात गव्हाची पेरणी वेळेवर करायची असेल तर तुम्ही दोन ओळीत 22.5 से.मी. अंतर ठेवून करावी. पेरणी जर उशिरा होत असेल तर दोन ओळीत 18 से.मी. अंतर ठेवून पेरणी करावी. गव्हाची पेरणी शक्यतो जास्त खोलवर करू नये. साधारणतः 5 ते 6 से.मी. खोलीवर गव्हाची पेरणी करावी.

जिरायती गव्हाची पेरणी करताना दोन ओळीत सुमारे 20 से.मी. अंतर ठेवून पेरणी करावी. बियाणे व्यवस्थित जमिनीत दाबून मातीने झाकून जाण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा.

सारे पाडताना जमिनीचा उतार लक्षात घ्यावा. 2.5 ते 4 मीटर रुंदीचे तर 7 ते 25 मीटर लांबीचे सारे पाडावे.

गव्हाच्या पिकासाठी खत व्यवस्थापन कसे करावे ?

बागायती शेतीत गव्हाची लागवड करताना वेळेवर जर पेरणी झाली असेल तर हेक्टरी 120 किलो नत्र, 40 किलो पालाश आणि 60 किलो स्फुरद लागेल.पेरणी करतानाच नत्राची अर्धी मात्रा,पालाश आणि स्फुरद यांची संपूर्ण मात्रा द्यावी. राहिलेली नत्राची मात्रा तीन आठवड्यांनी खुरपणी करून झाल्यावर द्यावी.

बागायती शेतीत गव्हाची पेरणी वेळेवर झाली नाही तर हेक्टरी 80 किलो नत्र, 40 किलो पालाश आणि 40 किलो स्फुरद लागेल.पेरणीच्या वेळेस नत्राची अर्धी मात्रा, पालाश 40 किलो आणि स्फुरद 40 किलो द्यावे. राहीलेली नत्राची मात्रा तीन आठवड्यांनी खुरपणी करून झाल्यावर द्यावी.

जिरायती शेतीत गव्हाची लागवड करताना 40 किलो नत्र आणि स्फुरद लागते. दोन टक्के युरियाचे द्रावण तयार करून त्याची करावी. ही फवारणी पेरणी झाल्यावर 65 ते 70 दिवसांनी करावी.

गव्हाच्या पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे करावे?

गव्हाच्या पिकासाठी पाणी मुबलक प्रमाणात लागते. भारी प्रतीच्या जमिनीसाठी साधारणतः दर 18 ते 21 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या 6 पाळ्या द्याव्यात. मध्यम प्रतीच्या जमिनीसाठी 15 दिवसांच्या अंतराने 7 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. हलक्या प्रतीच्या जमिनीसाठी 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या 8 ते 10 पाळ्या द्याव्यात.

जर तुम्हाला पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नसेल तर खालील प्रमाणे पाणी व्यवस्थापन करून पाणी द्यावे.

एकच पाणी देणे होत असेल तर तुम्ही गव्हाच्या पेरणी नंतर 21 ते 25 दिवसांनी पाणी द्यावे.

दोन वेळा पाणी देणे होत असेल तर तुम्ही पाहिले पाणी पेरणीनंतर 21 ते 25  दिवसांनी आणि दुसरे पाणी 55 ते 60 दिवसांनी पाणी द्यावे.

तीन वेळा पाणी देणे होत असेल तर तुम्ही पाहिले पाणी 21 ते 25 दिवसांनी दुसरे पाणी 55 ते 60 दिवसांनी आणि तिसरे पाणी 70 ते 80 दिवसांनी द्यावे.

जर चार वेळा पाणी देणे होत असेल तर तुम्ही पाहिले पाणी 21 ते 25 दिवसांनी द्यावे. दुसरे पाणी 55 ते 60 दिवसांनी द्यावे. तिसरे पाणी 70 ते 80 दिवसांनी द्यावे तर चौथे पाणी 90 ते 100 दिवसांनी द्यावे.

पाच पाणी देणे होत असेल तर तुम्ही पाहिले पाणी 21 ते 25 दिवसांनी द्यावे. दुसरे पाणी 40 ते 50 दिवसांनी द्यावे. तिसरे पाणी 55 ते 60 दिवसांनी द्यावे. चौथे पाणी 70 ते 80 दिवसांनी द्यावे आणि पाचवे पाणी 90 ते 100 दिवसांनी द्यावे.

आंतर मशागत कशी करावी ?

तुम्हाला जर गव्हाचे भरघोस पीक घ्यायचे असेल तर तुम्ही शेतीची आंतर मशागत व्यवस्थित करून घ्यावी. आंतर मशागत व्यवस्थित करून घेताना  तणांचे व्यवस्थापन व्यवस्थित करणे खूप गरजेचे आहे.

पेरणी झाल्यावर साधारणतः 30 ते 40 दिवसांच्या आत एक किंवा दोन वेळा तरी निदान निंदण करून घेणे खूप गरजेचे आहे. जर तणाचे प्रमाण अधिक असेल तर तणनाशक मारावे.

पीक कांडी अवस्थेत आले की तण मजुरांच्या द्वारे काढता येत नाही. पिकाची नासाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तणनाशक वापरून तण व्यवस्थापन करावे. वाढते मजुरीचे दर तसेच आवश्यक त्या वेळी मजूर उपलब्ध होत नाहीत त्यावेळेस तणनाशक वापरणे गरजेचे ठरते. परंतु तणनाशक आणि इतर रासायनिक खते यामुळे जमिनीचा पोत कालांतराने खराब होऊ शकतो. त्यामुळे योग्य सांगड घालूनच शेतीचे व्यवस्थापन करून घ्यावे.

गव्हाच्या पिकात हरळी, चांदवेल याप्रकारचे तण असतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार एक किंवा दोन खुरपणी त्याचप्रमाणे कोळपणी करून घ्यावी. त्यामुळे जमीन मोकळी होते तसेच गव्हाचे पीक व्यवस्थित वाढण्यास मदत होते.

तणनाशक कोणते वापरावे ?

गव्हाच्या पेरणीनंतर साधारणतः 30 ते 35 दिवसांनी प्रति आयसोप्रोट्युरोन दोन ते तीन किलो वापरावे. तुम्ही त्या ऐवजी मेटा सल्फुरोन मेथाइल प्रति हेक्टर वीस ग्रॅम किंवा युरिया 600 ते 1250 ग्रॅम  घेऊन ते 600 ते 800 लिटर पाण्यात मिसळून ते गव्हाच्या दोन ओळीत फवारावे.

तणनाशक फवारल्यानंतर सुमारे 10 ते 12 दिवस पाणी देणे टाळावे. तणनाशक फवारण्यासाठी साधा नॅपसक पंप वापरावा. पॉवर स्प्रे चा उपयोग करू नये.

आंतर मशागतीमुळे शेतातील तण व्यवस्थापन होऊन जमीनीचा ओलावा धरून राहण्यास मदत होते.

सध्याच्या काळात निसर्गाचे संतुलन बिघडले आहे. ओला दुष्काळ किंवा सुका दुष्काळ यामुळे हाती आलेली पिके जातात. वादळ,अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. तरी देखील शेतकरी हिम्मत न हारता शेती कसत आहे. तेव्हा शेतकऱ्याने योग्य शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थित नियोजन करून चांगले उत्पादन घेऊ शकतो.

तुम्हाला जर आमचा हा लेख आवडला असेल तर नक्की कळवा.

तुम्हाला कुल्लू मनाली या हील स्टेशन बाबत माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील लिंकवरून तुम्ही माहिती घेऊ शकता.

kullu Manali Touring Place In India 2021 | कुल्लू मनाली – भारतातील पर्यटन ठिकाण

आमच्या http://www.historicaltouch.com या वेबसाईटला भेट देऊ शकता.

स्रोत : गूगल

Leave a Comment