Rajesh Khanna Information In Marathi | हिंदी चित्रपसृष्टीतील पहिला सुपरस्टार – राजेश खन्ना

Rajesh Khanna Information In Marathi | हिंदी चित्रपसृष्टीतील पहिला सुपरस्टार – राजेश खन्ना

हिंदी चित्रपसृष्टीतील पाहिले खरे सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना (Rajesh Khanna Information In Marathi )एक प्रसिद्ध अभिनेते होते. राजेश खन्ना यांना अल्पावधीत जी प्रसिद्धी मिळाली ती अन्य कोणत्याही अभिनेत्याला मिळविता आलेली नाही. काका या टोपणनावाने देखील राजेश खन्ना हे ओळखले जात असे. सत्तरच्या दशकात धुमाकूळ घालणाऱ्या या सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबाबत माहिती आपण घेऊ या.

Rajesh Khanna Information In Marathi

हिंदी चित्रपट सृष्टीतील पाहिले खरे सुपरस्टार राजेश खन्ना यांचा अल्प परिचय : Rajesh Khanna Information In Marathi

राजेश खन्ना यांचे वास्तविक नाव जतिन  खन्ना होते. त्यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1942 ला अमृतसर , पंजाबमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लाला हिराचंद होते तर आईचेे नाव चंद्रानी खन्ना होते. राजेेेेेेश खन्ना यांनी 1973 मध्ये डिंपल कपाडिया हीचेसोबत लग्न केले. त्यांना ट्विंकल आणि रिंकी ह्या दोन मुली आहेत. प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार हे राजेश  खन्ना यांचे मोठे जावई आहेत.

राजेश खन्ना यांचे  पहिला चित्रपट कोणता आहे ?

राजेश खन्ना यांचा पहिला चित्रपट आखरी खत हा आहे. हा चित्रपट 1966 मध्ये प्रदर्शित झाला. आखरी खत हा चित्रपट  प्रसिद्ध दिग्दर्शक चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केला होता.

राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीला वळण देणारा चित्रपट – आराधना

आखरी खत या पहिल्या चित्रपटानंतर  राजेश खन्ना यांचे बरेच चित्रपट आले. परंतु ते चित्रपट विशेष चालले नाहीत. अशातच त्यांना एका चित्रपटाची ऑफर आली. तो चित्रपट होता आराधना . त्या काळातील प्रसिद्ध दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी या चित्रपटाची पटकथा राजेश खन्ना यांना ऐकिविली. परंतु राजेश खन्ना यांनी या चित्रपटाची पटकथा ऐकून हा चित्रपट करण्यास नकार दिला. कारण त्यांच्या मते हा चित्रपट नायिका प्रधान होता आणि ते खरेही होते. परंतु राजेश खन्ना यांना हा चित्रपट करण्यास शक्ती सामंत यांनी प्रवृत्त केले. जेव्हा आराधना  हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा हिंदी चित्रपट सृष्टीला पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या रूपाने मिळाला. हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. या चित्रपटातील कथा आणि गाणी खूप लोकप्रिय झाली.

या चित्रपटाने केवळ राजेश खन्ना यांचेच नशीब बदललंं नाही तर किशोर कुमार यांच्याही कारकिर्दीतील हा महत्त्वपूर्ण चित्रपट ठरला.

हे ही वाचा : Amitabh Bachchan Information In Marathi | अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन माहिती

राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रु यांचे प्रेमप्रकरण :

राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रु यांचे प्रेमप्रकरण हे दोघेही हिंदी चित्रपट सृष्टीत येण्याआधीच सुरू होते. दोघेही सोबतच शिक्षण घेत होते.

त्यांचे अफेअर जवळपास सात वर्षे चालले होते. हिंदी चित्रपट सृष्टीचे पहिले सुपरस्टार बनलेले राजेश खन्ना यांचे वागणे बदलले. असे म्हणतात की, राजेश खन्ना हे अंजू महेंद्रु यांच्याबाबत खूप पझेसिव्ह होते. अंजू यांच्यामते राजेश खन्ना हे लहरी  स्वभावाचे होते. तसेच ते थोडे पारंपारिक विचाराचेही होते. अंजू यांनी शॉर्ट स्कर्ट घातलेले राजेश खन्ना यांना आवडत नसे.

राजेश खन्ना यांचे हे अतिरेकी वागणे हे अंजुला खूप त्रासदायक झाले. याचा परिणाम असा झाला की शेवटी अंजू महेंद्रु आणि राजेश खन्ना हे वेगळे झाले. जेव्हा राजेश खन्ना यांनी अंजू महेंद्रु यांना लग्नासाठी प्रपोज केले तेव्हा अंजूने राजेश खन्ना यांचा लग्नाचा प्रस्ताव नम्रपणे नाकारला. अशाप्रकारे तत्कालीन सर्वात चर्चिले जाणारे प्रेम प्रकरणाचा शेवट झाला.

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचे लग्न :

अंजू महेंद्रु यांच्यासोबतचे  अफेअर संपुष्टात आल्यावर लगेच राजेश खन्ना यांनी सर्वांना  अनपेक्षित धक्का दिला. त्यांनी  स्वतःपेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या डिंपल कपाडिया हीचेसोबात लग्न केले.

डिंपलचा नुकताच बॉबी हा चित्रपट सुपर हिट झाला होता. बॉबी या चित्रपटाद्वारे पदार्पण करणाऱ्या डिंपलने  सर्वांना वेड लावले , त्यात राजेश खन्ना हे देखील होते.

परंतु राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया हे लग्नानंतर केवळ अकरा वर्षांनीच वेगळे झाले. मात्र त्या दोघांनी घटस्फोट घेतला नाही. राजेश खन्ना आणि डिंपल यांच्या वेगळे होण्याची माहिती ही  Rajesh Khanna : The Untold Story of India’s First Superstar या बायोग्राफित सांगितले आहे. या पुस्तकाचे लेखक  यासिर उस्मान हे आहेत.

यासिर उस्मान यांच्यानुसार राजेश खन्ना आणि टीना मुनीम आणि राजेश खन्ना हे यांच्यातील जवळीक खूप वाढत होती. जेव्हा राजेश खन्ना आणि टीना मुनीम हे युरोपमध्ये  एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी गेले होते तेव्हा डिंपल कपाडिया ही देखील राजेश खन्ना यांच्यासोबत होती. त्यावेळेस राजेश खन्ना आणि टीना  मुनीम यांच्यातील वाढती जवळीक डिंपल हिच्या लक्षात आली. तेव्हा डिंपल तत्काळ युरोपमधून भारतात निघून आली. ती स्वतःच्या घरी न जाता सरळ आपल्या आईवडिलांच्या घरी गेली.

डिंपल आणि राजेश खन्ना हे दांपत्य जरी वेगळे झाले तरी त्यांनी घटस्फोट मात्र घेतला नाही. असे  म्हणतात कि, डिंपल हिने मुलींची सर्व आर्थिक जबाबदारी राजेश खन्ना यांच्यावर टाकली होती. राजेश खन्ना यांनी ही अट मान्य केली नाही. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाचे प्रकरण पुढे सरकले नाही.

अशा प्रकारे राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया हे वेगळे झाले. मात्र डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांनी दुसरे लग्न केले नाही.

राजेश खन्ना यांचे विविध अभिनेत्रींसोबत गाजलेले चित्रपट :

राजेश खन्ना हे खऱ्या अर्थाने हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अनेक अभिनेत्रींसोबत त्याची जोडी प्रेक्षकांना भावलेली दिसून येते.

राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर :

Rajesh Khanna Information In Marathi
सौजन्य : twitter.com

शर्मिला टागोर ही अभिनेत्री तर राजेश खन्ना यांच्या आयुष्यातील turning point आहे. या जोडीचा आलेला आराधना याच चित्रपटाने हिंदी चित्रपट सृष्टीला पहिला सुपरस्टार देऊन राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीला  महत्वाचे वळण दिले.

शर्मिला टागोरसोबत राजेश खन्ना यांनी केलेले काही महत्वाचे चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत. आराधना, आविष्कार, अमरप्रेम, त्याग, सफर, राजा राणी, दाग, मालिक आणि छोटी बहु हे या जोडीचे काही चित्रपट आहेत.

राजेश खन्ना आणि मुमताज :

Rajesh Khanna Information In Marathi
सौजन्य : rediff.com

मुमताज आणि राजेश खन्ना ही जोडी त्यावेळेसची खूप लोकप्रिय जोडी होती. ऑनस्क्रीन ही जोडी जेवढी दिलखुलास होती तेवढीच खऱ्या आयुष्यातही होती. याला कारण होते मुमताजचा निर्मळ स्वभाव.

असे म्हणतात कि, दुश्मन चित्रपटाच्या शुटींगच्या दरम्यान स्वतः मुमताजने राजेश खन्ना यांना चाहत्यांच्या गराड्यातून वाचविले होते. सुपरस्टार असलेल्या राजेश खन्नाला जवळून  बघण्यासाठी  शुटींग होत असलेल्या गावातील लोकांनी एकदमच खूप गर्दी केली होती. लोकांना नियंत्रित करणे हाताबाहेर होऊन गेले होते. शेवटी मुमताज त्या गर्दीत घुसून राजेश खन्नाला हात धरून बाहेर काढले होते. त्यावेळी राजेश खन्ना यांचे केस तर विस्कटले होतेच शिवाय शर्टही फाटला होता.

या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. दो रास्ते ( 1969 ), बंधन (1969), सच्चा झूठा (1970), दुश्मन (1971), अपना देश(1972) आप कि कसम (1974), रोटी (1974) आणि प्रेम कहाणी (1975) हे या जोडीचे काही गाजलेले चित्रपट आहेत. या जोडीने खरच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

राजेश खन्ना आणि आशा पारेख :

Rajesh Khanna Information In Marathi
सौजन्य: rediff.com

राजेश खन्ना आणि आशा पारेख या जोडीने सुद्धा अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडत होती.

बहारोके सपने हा या जोडीचा पहिला चित्रपट होता. 1967 ला हा चित्रपट आला होता. तो पर्यंत राजेश खन्ना यांचे बरेच चित्रपट फ्लॉप गेलेले होते. आशा पारेख यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्या काळात आशा पारेख ह्या नावाजलेल्या आणि आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यामुळे आशा पारेख यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.

परंतु नासीर हुसेन जे या चित्रपटाचे निर्देशक होते त्यांनी आशा पारेख यांना हा चित्रपट राजेश खन्ना यांच्यासोबत करण्यास तयार केले. हा चित्रपट मात्र फ्लॉप झाला. परंतु त्यानंतर आलेले अनेक चित्रपट या जोडीने सुपरहिट दिलेत.

आशा पारेख आणि राजेश खन्ना यांचे महत्वाचे चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत. कटी पतंग (1971),आन मिलो सजना , धर्म आणि कानून .

राजेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्ही आमच्या https://www.historicaltouch.com या website ला भेट देऊ शकता.

संदर्भ : गुगल

Leave a Comment