Kishor Kumar Information 2022 | किशोर कुमार यांच्याबाबत मनोरंजक माहिती

Kishor Kumar Information 2022 | किशोर कुमार यांच्याबाबत मनोरंजक माहिती

Kishor Kumar Information 2022

किशोर कुमार (Kishor Kumar Information 2022) हे हिंदी फिल्म सृष्टीतील एक महान गायक होते. किशोर कुमार हे केवळ गायकच नव्हते तर अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, निर्देशक आणि पटकथा लेखक देखील होते. किशोर कुमार यांनी केव्हा हिंदीतच गाणे म्हटले नाहीत तर  मराठी, बंगाली, असम, गुजराती, कन्नड, मल्यालम आणि उर्दू अशा इतर भाषेत ही  गाणी म्हटली. सर्वश्रेष्ठ गायक म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

किशोर कुमार यांचे प्रारंभिक जीवन :

किशोर कुमार यांचा जन्म मध्यप्रदेश मधील खंडवा या शहरात 14 ऑगस्ट 1919 मध्ये झाला. किशोर कुमार हे बंगाली कुटुंबातील होते. त्यांचे मूळ नाव आभास कुमार गांगुली होते.  त्यांचे वडील वकील होते.  त्यांचे नाव कुंजीलाल गंगोपाध्याय होते. त्यांच्या आईचे नाव गौरीदेवी होते. किशोर कुमार यांना दोन भाऊ आणि एक बहीण होती. अशोक कुमार आणि अनुप कुमार हे त्यांचे भाऊ तर बहिणीचे नाव सतीदेवी होते. अशोक कुमार हे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक उत्कृष्ट कलाकार आहेत. अनुप कुमार यांनीही काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. किशोर कुमार यांनी इंदूरमध्ये असलेल्या ईसाई कॉलेजमध्ये आपले ग्रॅज्युएट पूर्ण केले.

किशोर कुमार हे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी होते. ते खोडकर होते, विनोदी होते. त्यांचा हसमुख चेहरा समोरच्या व्यक्तीला आपलेसे करून टाकत असे. किशोर कुमार हे सर्वांनाच हवे हवेसे वाटणारे होते.

हे ही वाचा : अमिताभ बच्चन यांच्याबाबत माहिती

किशोर कुमार यांचा बॉलीवूडमध्ये प्रवेश : Kishor Kumar Information 2022

किशोर कुमार यांचे मोठे बंधू अशोक कुमार यांचा बॉलीवूडमध्ये व्यवस्थित जम बसल्यावर किशोर कुमारही मुंबई या मायानगरीत आपले नशीब आजमावण्यासाठी आले. त्याच वेळी त्यांनी आभास कुमार या नावाऐवजी किशोर कुमार हे नाव धारण केले. किशोर कुमार यांनी संगीताचे रीतसर शिक्षण घेतलेले नव्हते. परंतु त्यांच्यामध्ये गायकी उपजतच होती. सुरेख आवाजाची त्यांना देणगी मिळालेली होती. सुरुवातीला त्यांनी के.एल. सहगल या तत्कालीन सुप्रसिद्ध गायकाची नक्कल केली. परंतु लवकरच त्यांनी स्वतःच्या नैसर्गिक शैलीत गाणी गायला सुरुवात केली. यात मोलाचा वाटा होता तो संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा. त्यांनीच किशोर कुमार यांना के.एल. सहगल यांची नक्कल करण्यापासून परावृत्त केले आणि स्वतःची शैली विकसित करण्याचे सांगितले.

सुरुवातीला किशोर कुमार समूह गायक म्हणून बॉम्बे टॉकीजमध्ये काम करीत होते. त्यानंतर 1946 मध्ये किशोर कुमार यांनी पहिला चित्रपट शिकारी यामध्ये अभिनय केला. त्यावेळी त्यांचे वय केवळ 17 वर्षे होते. परंतु एक गायक म्हणून त्यांनी 1948 मध्ये जिद्दी या फिल्ममध्ये गाणी गायली. 1949 मध्ये हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये किशोर कुमार हे व्यवस्थित यांनी जम बसवला. त्यानंतर 1951 मध्ये देखील त्यांनी आंदोलन, नोकरी, मुसाफिर या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. किशोर कुमार हे एक विनोदी कलाकार म्हणूनही प्रसिद्ध होते त्यांची विनोदी भूमिका लोकांना खूप आवडत असे. चलती का नाम गाडी, हाफ तिकीट, पडोसन या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 1960 मध्ये यांनी निर्देशक म्हणून देखील आपले कार्य करण्यास सुरुवात केली. 1961 मध्ये आलेल्या झुमरू या चित्रपटाचे निर्देशन त्यांनी केले. ते या चित्रपटाचे निर्माता, गीतकार, संगीतकार देखील होते या चित्रपटामध्ये त्यांनी स्वतःच अभिनय केला. याच सोबतचा 1971 मध्ये दूर का राही,  दूर वादियो मे या चित्रपटाचे निर्माण आणि निर्देशन देखील त्यांनी केले. दूर गगन कि छाव में हा देखील त्यांचा उत्कृष्ट चित्रपट आहे.

1969 मध्ये आलेला आराधना या चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी तुफान गाजली. आणि या गाण्यांमुळे राजेश खन्ना यांना सुपरस्टारचा दर्जा प्राप्त झाला.

किशोर कुमार यांचे वैवाहिक जीवन :

किशोर कुमार यांनी एकूण चार लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रुमा घोष हे होते. त्यांनी रुमा घोष यांच्यासोबत 1951मध्ये लग्न केले होते. त्या एक प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि गायिका होत्या. रूमा आणि किशोर कुमार यांना एक मुलगा होता. त्याचे नाव अमित कुमार आहे. अमित कुमार हे देखील एक  गायक आहेत. 1958 मध्ये किशोर कुमार यांनी रुमा घोष यांना घटस्फोट दिला. यानंतर किशोर कुमार यांनी दुसरे लग्न त्या वेळची एक सफल अभिनेत्री असलेल्या मधुबाला यांच्यासोबत केले. 1960 मध्ये त्यांनी  मधुबाला यांच्यासोबत त्यांनी चलती का नाम गाडी आणि झुमरू या पिक्चर मध्ये काम केले. परंतु मधूबाला यांना हृदयाची बिमारी असल्यामुळे त्या लवकरच 1969 मध्ये मरण पावल्या. त्यानंतर किशोर कुमार यांनी तिसरी तिसरे लग्न योगिता बाली यांच्यासोबत 1976 मध्ये केले होते. परंतु हे लग्न दोन वर्षांनंतरच तुटले. त्यानंतर किशोर कुमार यांनी चौथे लग्न 1980 मध्ये लीना चंदावरकर या प्रसिद्ध अभिनेत्री सोबत केले. लीना आणि किशोर कुमार यांना एक मुलगा आहे त्याचे नाव सुमित कुमार असे आहे.

किशोर कुमार आणि आणीबाणी :

1970 मध्ये किशोर कुमार हे थोडे राजनीतीकडे वळले आणि इंदिरा गांधी यांनी जी आणीबाणी घोषित केली होती त्याला विरोध करणारे ते एकमेव हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार होते. काँग्रेसच्या मेळाव्यात किशोर कुमार यांनी गाणे न गायल्याने तेव्हा त्यांच्या गाण्यावर आकाशवाणी आणि दूरदर्शनवर बंदी देखील घालण्यात आलेली होती. विशेष म्हणजे त्या मेळाव्यात गाणे म्हणण्यासाठी संजय गांधी यांनी आग्रह केला होता. आयकर खात्याकडून त्यांच्यावर छापे मारल्या गेले. एक वेळ अशी आली कि किशोर कुमार तुरुंगात जाता जाता राहिले. यामुळे सर्व बाबींचा परिणाम त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरही झाला. त्यामुळे किशोर कुमार यांनी देश – विदेशात स्टेज शो करण्यास सुरुवात केली होती.

किशोर कुमार यांना मिळालेले पुरस्कार :

Kishor Kumar Information 2022

किशोर कुमार यांना सर्वोत्तम पार्श्वगायक म्हणून आठ फिल्मफेअर अवार्ड्स मिळालेले आहेत. सर्वात जास्त फिल्मफेअर अवॉर्ड मिळवण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. किशोर कुमार यांना ज्या गाण्यांसाठी सर्वोत्तम पार्श्वगायक म्हणून फिल्मफेअर अवार्ड्स मिळाले ती गाणी पुढीलप्रमाणे आहेत.

आराधना ( 1969) चित्रपटातील रूप तेरा मस्ताना, डॉन (1978) मधील खैके पान बनारसवाला, थोडीसी बेवफाई (1980) या चित्रपटातील हजार राहे मुडके देखी, नमक हलाल (1982) मधील पग घुंगरू बांध के मीरा नाची थी, अगर तुम ना होते (1983) या चित्रपटातील हमें और जिने कि, त्यानंतर 1984 ला आलेल्या शराबी या चित्रपटातील मंजिले अपनी जगह तर 1985 ला सागर या चित्रपटातील सागर किनारे या गाण्यांसाठी किशोर कुमार यांना फिल्मफेअर अवार्ड्स मिळाले. तर बऱ्याच गाण्यांसाठी त्यांना नामांकन मिळाले होते.

1985- 86 मध्ये मध्य प्रदेश सरकारद्वारा देण्यात येणारा लता मंगेशकर पुरस्कार त्यांना मिळाला. मध्यप्रदेश सरकारने किशोर कुमार यांच्या स्मृती प्रित्यर्थ 1997 मध्ये किशोर कुमार पुरस्कार हा पुरस्कार सुरू केला. हा पुरस्कार हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिल्या जातो. दरवर्षी 13 ऑक्टोबरला मध्यप्रदेशमधील किशोर कुमार यांच्या मूळ गावी दिल्या जातो.

किशोर कुमार यांनी गायलेली मराठी गाणी :

आपल्याला जाणून आनंद होईल कि, किशोर कुमार यांनी मराठीतही गाणी गायलेली आहेत. अशोक सराफ यांच्या गंमत जंमत या चित्रपटातील अश्विनी ये ना हे प्रसिद्ध गाणी त्यांनी गायले होते. तसेच तुझी माझी जोडी जमली हे गाणे देखील किशोर कुमार यांनी गायले होते. या गाण्यांना अरुण पौडवाल यांनी संगीत दिले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी किशोर कुमार यांनी घोळात घोळ या चित्रपटातील गोरा गोरा मुखडा हे गाणे गायले होते.

किशोर कुमार यांचा मृत्यू :

अशा या हरहुन्नरी अवलिया जादुगाराचा मृत्यू 13 ऑक्टोबर 1987 ला हृदयविकाराच्या झटक्याने झाले. किशोर कुमार यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा अंत्यसंस्कार खंडवा येथे झाला.

किशोर कुमार यांनी आपल्या चमत्कारिक सुमधुर आवाजाने जगभरातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आजही किशोर कुमार यांची गाणी तेवढ्याच उत्स्फूर्तपणे ऐकली जातात. खऱ्या अर्थाने किशोर कुमार यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले.

तुम्हाला आमचा Kishor Kumar Information 2022 हा  लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्ही आमच्या http://www.historicaltouch.com या website ला भेट देऊ शकता.

संदर्भ : गुगल

Leave a Comment