Kokanmadhil Paryatan Thikane | कोकणमधील पर्यटन ठिकाणे
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून तुम्हाला चेंज म्हणून कोठे फिरायला जायचे असेल तर कोकण ( Kokanmadhil Paryatan Thikane )तुम्हाला एक उत्तम पर्याय आहे. आपला महाराष्ट्र हा निसर्गाने मुक्तहस्ताने वरदान दिलेली भूमी आहे. महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळांपैकी कोकण हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. आजच्या लेखात आपण कोकणातील निसर्गरम्य ठिकाणे कोणती आहेत त्याबाबत माहिती जाणून घेऊ या.
१) तारकर्ली बीच :
समुद्रकिनारी फिरायला कोणाला आवडणार नाही ? त्यासाठी गोव्याला जाण्याची आवशक्यता नाही. तसं पाहता भारताची संपूर्ण पश्चिम किनारपट्टीच नैसर्गिक सौंदर्याने भरलेली आहे. कोकणमध्ये तुम्ही गेल्यावर तारकर्ली बीच आहे. तारकर्ली बीच हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या निसर्गरम्य गावापासून दक्षिण दिशेला सुमारे ८ कि.मी. अंतरावर हा बीच आहे. या ठिकाणी अरबी समुद्रास कर्ली नदी मिळते.
तारकर्ली बीच अतिक्षय स्वच्छ आणि सुंदर आहे. येथील अद्भुत नैसर्गिक सौंदर्याने मनाला भुरळ पडते. जगातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर म्हणून तारकर्ली बीचला मान्यता देण्यात आलेली आहे. तारकर्ली येथील नितांत सुंदर समुद्रकिनारा , सभोवती असलेली बांबू आणि सुपारीची झाडे तारकर्लीचे सौंदर्य वाढवितात.
या ठिकाणी पर्यटकांसाठी स्कुबा डायविंग आणि इतर विविध प्रकारच्या activities उपलब्ध आहेत. तुम्हाला जर डॉल्फिन मासा बघायचा असेल तर तुम्ही डॉल्फिन पॉइंट याठिकाणी बघू शकता. याशिवाय गोल्डन रॉक, संगम पॉइंट ( कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम) , त्सुनामी आयलंड हे पॉइंटही तुम्ही बघू शकता. समुद्रात जाण्यासाठी ज्या बोटी सुटतात, त्या कर्ली नदीतूनच सुटतात.
तारकर्लीपासून जवळच निवती आणि भोगवे बीच आहेत. या दोन्ही बीचवर मनुष्य वस्ती नाही. त्याचप्रमाणे देवबागही येथून जवळच आहे. मालवणहून देवबाग सुमारे ११ कि.मी.आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेला सिंधुदुर्ग किल्ला येथून जवळच आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याला जाण्यासाठी मालवण जेट्टीवरून बोटी जातात.
तारकर्ली येथे पर्यटकांसाठी वेगवेगळी हॉटेल्स आहेत त्यामुळे निवासाची काही गैरसोय होणार नाही. पर्यटकांना आराम करण्यासाठी MTDC बीच रिसोर्टच्या झोपड्या आहेत. सी-फूड हे येथील खाशियत आहे. ज्यांना सी-फूड आवडते त्यांची या ठिकाणी चंगळ आहे.
तारकर्ली बीचवर जाण्यासाठी पर्यटकांना मडगाव येथून बसेस, रिक्षा उपलब्ध आहेत. या ठिकाणी रेल्वे आणि विमानेही येत येते. रेल्वेने येण्यासाठी कुडाळ हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. कुडाळपासून तारकर्ली ४५ कि.मी. अंतरावर आहे. जर तुम्हाला विमानाने जायचे असेल तर गोव्यातील दाबोलीम या विमानतळावर उतरावे लागेल. तारकर्ली हे मुंबईपासून सुमारे ५४० कि.मी. लांब आहे.
हे ही वाचा : कुल्लू मनाली हील स्टेशन
२) श्रीवर्धन बीच :
महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यापैकी एक श्रीवर्धन बीच आहे. अतिक्षय सुंदर आणि शांत असा हा श्रीवर्धन बीच आहे. पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे जन्मस्थान असलेले श्रीवर्धन हे रायगड जिल्यात आहे.
श्रीवर्धनच्या एका बाजूला सह्याद्री पर्वत तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे. समुद्रलाटांचे विलोभनीय दृश्य या ठिकाणी पर्यटकांना अनुभवता येते. सूर्यास्ताचे दृश्यदेखील पर्यटकांना आकर्षित करून घेते.
श्रीवर्धन बीच या ठिकाणी असलेले लक्ष्मीनारायण मंदिर खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर जवळपास दोनशे वर्षे जुने आहे. पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे स्मारकही या ठिकाणी आहे.
श्रीवर्धन मुंबईपासून १८२ कि.मी. , पुण्यापासून १६२ कि.मी. तर अलिबागपासून ११७ कि.मी. लांब आहे.
3 ) अलिबाग :
अलिबाग हे कोकणातील आणखी एक रमणीय ठिकाण आहे. मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी हे शहर वसविले असे म्हटले जाते.
अलिबागमध्ये किहीम, नवगाव, थळ, वरसोली, अक्षी, नागाव आवास,सासवणे, रेवस, चौल, मांडवा,कोर्लई,काशीद हे प्रसिद्ध आहेत.
किहीम बीच हा अलिबागमधील असाच एक चित्तवेधक समुद्रकिनारा असून पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. हा बीच सुंदर आणि स्वच्छ आहे. पांढऱ्या वाळू करिता हा बीच प्रसिद्ध आहे.
अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक मंदिरे, चर्च तसेच पुरातन वास्तू आहेत. त्यामध्ये कनकेश्वर मंदिर, गणेश मंदिर, उमा-महेश्वर मंदिर, बाळाजी मंदिर, दत्त मंदिर, हिंगुलजा मंदिर आहेत. कान्होजी आंग्रे समाधी, चुंबकीय वेधशाळा, कुलाबा,खांदेरी, उंदेरी, जंजिरा हे किल्ले अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत.
असे म्हटले जाते कि, मराठी भाषेतील पहिला शिलालेख अक्षी या गावात आहे. सासवणे या ठिकाणी करमरकर शिल्पालयातील सुबक मुर्त्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
मुंबईपासून जवळपास १०० कि.मी. अंतरावर हे पर्यटन स्थळ असून तुम्ही येथे भेट देऊन नक्कीच खुश होणार.
हे ही वाचा : हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिला सुपरस्टार राजेश खन्ना
४) आरे वारे बीच :
गणपतीपुळ्याहून रत्नागिरीकडे जाताना जवळपास 12 कि.मी. अंतरावर आरे वारे बीच आहे. या ठिकाणी निसर्गाची अद्भुत किमया बघायला मिळते. या ठिकाणी समुद्रात डोंगर घुसलेला आहे , त्यामुळे येथे जुळे समुद्रकिनारे आरे आणि वारे तयार झाला.
नितांत सुंदर असलेला हा समुद्रकिनारा आकाश निरभ्र असतांना सुरेख दिसतो. रत्नागिरी तालुक्यात असलेला आरे वारे बीचसाठी गणपतीपुळे येथून बसेस आणि खाजगी वाहने उपलब्ध आहेत.
५)गणपतीपुळे :
गणपतीपुळे ही कोकणची खास ओळख आहे. रत्नागिरी जिल्ह्यात असलेले गणपतीपुळे हे गाव जवळपास २५ कि.मी. लांब आहे. सुमारे सोळाशे वर्षांपूर्वीचे स्वयंभू गणपती मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
गणपतीपुळे येथे माडांची आणि आंब्याची झाडे पुष्कळ आहेत. त्यामुळे येथे गर्द हिवराई दिसते.
बाळभटजी भिडे यांनी गवताचे छप्पर उभारून गणपतीची पूजा केली होती असे म्हणतात. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात अष्टप्रधान मंडळातील सचिव अनाजी दत्तो यांनी एक सुंदर घुमट उभारून दिला. काही काळाने पुढे पेशव्यांचे सरदार गोविंदपंत बुंदेले यांनी देवालयाचा सभामंडप बांधला.
गणपतीपुळे येथील भाद्रपदी उत्सव, माघ उत्सव, दसरा आणि दिवाळी सण तसेच वसंत पूजा हे उत्सव पाहण्यासारखे असतात.
६)दापोली :
दापोलीला कोकणाचे हृदय म्हणून ओळखले जाते. मुंबईपासून दापोली जवळ आहे. दापोली हे निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील रमणीय भूप्रदेश पाहून पर्यटक भारावून जातात.
दापोली हे महाराष्ट्रातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. येथील वातावरण वर्षभरही तुलनेने थंडच राहते. त्यामुळे दापोलीला मिनी महाबळेश्वर असेही म्हटल्या जाते. दापोलीच्या आजूबाजूला बरेचशे किल्ले आणि गुहा आहेत. दापोलीला महाराष्ट्रातील अनेक महान लोकांचे निवासस्थान देखील आहेत. त्यामुळे इतिहासप्रेमी पर्यटकांची येथे नेहमीच वर्दळ असते. दापोलीजवळील उन्हेरे येथील नैसर्गिक गरम पाण्याचा झरा आहे.
दापोली हे मुंबईपासून सुमारे २२० तर पुण्यापासून जवळपास १८२ कि.मी. लांब आहे.
७) कोकणातील किल्ले :
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला पाहल्याशिवाय कोणीही मराठी माणूस परत येऊ शकत नाही. रायगड किल्ला बघितल्याशिवाय या किल्ल्याची महती समजणार नाही.
कोकणातील आणखी एक प्रसिद्ध किल्ला म्हणजे मुरुड – जंजिरा होय. रायगड जिल्ह्यात असलेला हा किल्ला इतिहासप्रेमी पर्यटकांचे आकर्षण आहे. चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला हा किल्ला स्वराज्यासाठी नेहमीच डोकेदुखी राहिला आहे.
याशिवाय कोकणामध्ये कुलाबा किल्ला, पद्मदुर्ग( जलदुर्ग कासा), उंदेरी किल्ला, खांदेरी किल्ला, कोर्लई किल्ला आणि सागरगड हे किल्ले बघण्यासारखे आहेत.
९)थिबा राजवाडा :
थिबा राजवाडा रत्नागिरी येथे आहे. ब्रिटिशांनी ब्रम्हदेशाच्या थिबा राजाला कैद करून रत्नागिरी येथील वाड्यात ठेवले होते. यालाच थिबा राजवाडा असे म्हटले जाते. थिबा राजवाडा ब्रिटिशांनी बांधलेला आहे. सध्या या ठिकाणी प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे.
१०) लोकमान्य टिळकांचे घर :
भारतीय स्वातंत्र्य लढयातील अग्रणी असलेले भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचे राहते घर रत्नागिरी येथे आहे. १८५६ साली या घरात लोकमान्य टिळकांचा जन्म झाला.
लोकमान्य टिळकांचे मूळ गाव तसे दापोलीतील चिखलगाव होय. परंतु टिळकांचे वडील रत्नागिरीत शिक्षक असल्याने ते तेथे इंदिराबाई गोरे यांच्या घरी भाड्याने राहत होते. टिळकांचा जन्म झालेले हे घर रत्नागिरीतील मध्यवर्ती भागात आहे. टिळक जवळपास १० वर्षे या घरात राहिले. पर्यटकांसाठी टिळकांचे घर खुले आहे.
कोकण पर्यटन Kokanmadhil Paryatan Thikane करून तुम्ही नक्कीच ताजेतवाने व्हाल यात काही शंकाच नाही.
तुम्हाला आमचाKokanmadhil Paryatan Thikane हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.
तुम्ही आमच्या http://www.historicaltouch.com या website ला भेट देऊ शकता.
संदर्भ : गुगल