Akshay Kumar Biography In Marathi | अक्षय कुमारविषयी अधिक माहिती

Akshay Kumar Biography In Marathi | अक्षय कुमारविषयी अधिक माहिती

Akshay Kumar Biography In Marathi

आजच्या या पोस्टमध्ये आपण बॉलीवूडमधील सुप्रसिध्द अभिनेता अक्षय कुमार Akshay Kumar Biography In Marathi याच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ या.

Akshay Kumar Biography In Marathi  | अक्षय कुमारविषयी अधिक माहिती

अक्षय कुमारचा (akshay-kumar-biography-in-marathi) जन्म 9 सप्टेंबर 1967 ला अमृतसर , पंजाबमध्ये झाला. त्याचे खरे नाव राजीव हरी ओम भाटिया असे आहे. त्याचे वडील सुरुवातीला सैन्यात होते. त्यांनी नंतर युनिसेफमध्ये अकाऊंटंट म्हणून कार्य केले. त्याच्या आईचे नाव अरुणा भाटिया असून त्या हाऊस वाइफ आहेत.

अक्षय कुमारचे सुरुवातीचे शिक्षण दार्जिलिंग येथील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर पुढील शिक्षण मुंबईतील गुरू नानक खालसा या महाविद्यालयात झाले.

5 फूट 11 इंच उंचीचा हा तगडा अभिनेता बॉलिवूडमध्ये खिलाडी या नावाने ओळखला जातो. अर्थात खिलाडी हा अक्षय कुमारचा एक गाजलेला चित्रपट आहे. बँकॉकमध्ये मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतलेला हा अभिनेता तेथे काही काळ शेफ म्हणूनही काम करीत होता.

Akshay Kumar Biography In Marathi

अक्षय कुमार याचे लग्न हिंदी चित्रपटसृष्टीतील पाहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची मोठी मुलगी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हीचेसोबत 17 जानेवारी 2001 मध्ये झाले आहे.या दांपत्याला आरव हा मुलगा तर मुलीचे नाव नितारा आहे.

सुरुवातीला मॉडेलिंगचे काम केल्यानंतर चित्रपट सृष्टीत आपले नशीब आजमवण्यासाठी अक्षय कुमारने प्रयत्न केले. मॉडेलिंग , चित्रपट सृष्टीतील त्याचा प्रवेश देखील चमत्कारिकच आहे. बँकॉकहून आल्यावर अक्षयने काही काळ कोलकात्या ला काम केले. नंतर तो मुंबईला आला. तेथे त्याने दिल्लीहून दागिने आणून मुंबईला विकायचे काम केले. हे काम करीत असताना तो संध्याकाळच्या वेळी मार्शल आर्टचे क्लास ही घेत असे. अक्षयचा एक विद्यार्थी फोटोग्राफर होता. त्याने अक्षयला मॉडेलिंग क्षेत्रात येण्याची ऑफर दिली. तगडा, उमदा असलेला अक्षय मॉडेलिंगसाठी निवडला गेला. केवळ दोन दिवसाच्या शूटवर त्याला 20000 रुपयेही मिळाले.

एकदा मॉडेलिंगसाठी अक्षयला बंगळुरूला जायचे होते. ज्या विमानाने जायचे होते त्याची वेळ सकाळी 7 वाजताची होती. अक्षयला संध्याकाळी 7 वाजताची वाटली. या गल्लतने अक्षयची ती संधी हुकली. तो खूप नाराज झाला. मात्र त्याच दिवशी तो नटराज स्टुडिओ मध्ये गेला. तेथे अक्षयला एका चित्रपटासाठी साईन केल्या गेले. या चित्रपटातील केवळ सात सेकंदाच्या भूमिकेसाठी त्याला 5000 रुपये मिळाले. येथून अक्षयचा फिल्मी सफर सुरू झाला. या चित्रपटातील त्या पात्राचे अक्षय हेच नाव त्याने चित्रपट सृष्टीत स्वतःसाठी निवडले. जर त्या दिवशी बंगळुरूला गेला असता तर तो कदाचित मॉडेलिंग क्षेत्रात राहला असता.

अक्षय हा बॉलिवूड मध्ये सर्वात वक्तशीर अभिनेता म्हणून ओळखला जातो. वेळेवर येणे आणि आपले काम चोखपणे बजावून वेळेवरच निघून जाणे त्याला आवडते. रात्री लवकर झोपून सकाळी 4 वाजता उठून तो आपली दिनचर्या सुरू करतो. आरोग्याकडे अक्षय खूप लक्ष देतो. त्यामुळे या वयातही तो इतका फिट आहे.

हे ही वाचा : Amitabh Bachchan Information In Marathi | अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन माहिती

सौगंध या चित्रपटामधून अक्षयने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.परंतु अक्षयने सौगंधच्या अगोदर दिदार हा चित्रपट साईन केला होता. सौगंध हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी करू शकला नाही.

त्यानंतर अक्षयचे बरेच चित्रपट आले. परंतु अक्षयचा पहिला हिट चित्रपट म्हणजे खिलाडी हा होय. आयेशा झुल्का आणि दिपक तिजोरी सहकलाकार असलेला हा चित्रपट अक्षयसाठी फार मोलाचा ठरला. अक्षयला खिलाडी म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली. त्यानंतर अक्षयने खिलाडी हा शब्द असलेले अनेक चित्रपट केलेत. त्या यादीमध्ये सबसे बडा खिलाडी, खिलाडीओ का खिलाडी, मै खिलाडी तू अनाडी, इंटरनॅशनल खिलाडी, खिलाडी 786, खिलाडी 428, मिस्टर अँड मिसेस खिलाडी असे काही चित्रपट आहेत.

सुरुवातीला अक्षय कुमारने जे चित्रपट केले त्यातील भुमिकांवरून त्याची अँक्शन हिरो ही इमेज तयार झाली. मोहरा, खिलाडी चित्रपटांची सिरीज ही त्याची उदाहरणे आहेत.

परंतु या नंतर अक्षय कुमारने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. त्याने आपल्या अभिनयात विविधता आणली. धडकन, संघर्ष,अंदाज, ये दिल्लगी, एक रिश्ता द बाँड, खाकी, बेवफा, हा मैने भी प्यार किया है, जानवर अशा काही चित्रपटातून त्याने इमोशनल भूमिका केल्या.

तर अजनबी या चित्रपटात अक्षयने खलनायकाची भूमिका केली होती. अजनबी चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारही मिळाला आहे.

नमस्ते लंडन , हमको दिवाना कर गये, अशा चित्रपटातून त्याने रोमँटिक भूमिका पार पाडल्या.

हळू हळू अक्षय कुमारने आपल्या अँक्शन हिरो या इमेजमध्ये बदल केला. आता अक्षय कुमारने कॉमेडी भूमिकाही करायला सुरुवात केली. हेरा फेरी, फिर हेराफेरी, वेलकम, गरम मसाला, हाऊस फुल चित्रपटांची मालिका, मुझसे शादी करोगे, जोकर , सिंग इज किंग, गूड न्यूज, दिवाने हुए पागल, भागम भाग, दे दना दन अशा चित्रपटातून त्याने विनोदी भूमिका करीत आपल्या अभिनयातून चाहत्यांना खुश केले.

अक्षय कुमारने यशाचे शिखर गाठता गाठता अनेक हिट, सुपरहिट चित्रपट दिले. सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे चित्रपट केलेत. Padman, टॉयलेट एक प्रेमकथा , गब्बर इज बॅक, रुस्तम, जॉली एल एल बी 2 , असे चित्रपट करीत अक्षयने आपल्या अभिनयाचे पैलू समोर आणले.

अक्षय कुमारने मिशन मंगल, अब तुम्हारे हवाले वतन साथीओ, बेबी, एअरलिफ्ट, बेल बॉटम, हॉलिडे, असे देशभक्तीपर चित्रपटही केले.

अक्षय कुमारला मिळालेले पुरस्कार आणि नामांकन : akshay kumar biography in marathi

अक्षय कुमारने प्रथमच त्याच्या कारकीर्दीत प्रथमच अजनबी या चित्रपटात नकारात्मक भूमिका केली. त्या भूमिकेचे खूप कौतुक केले गेले. त्यासाठी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट खलनायकाच्या भूमिकेसाठी पुरस्कृत करण्यात आले होते.

अक्षयला त्याच्या बॉलीवूडमधील योगदानाबद्दल राजीव गांधी पुरस्काराने 2004 साली पुरस्कृत करण्यात आले होते.

त्यानंतर 2006 साली अक्षयला गरम मसाला या चित्रपटांमध्ये केलेल्या विनोदी भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून स्टार स्क्रीनचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

अक्षय कुमारला सन 2008 ला विचार विंडसोर युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेटने त्याच्या भारतीय चित्रपटांमधील योगदानासाठी पुरस्कृत करण्यात आले होते.

पद्मश्री पुरस्कार देखील अक्षयला मिळाला आहे. त्याला सन 2009 ला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्याच साली सिंग इज किंग या चित्रपटामधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आशियायी फिल्म पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

देसी बॉइज या चित्रपटासाठी अक्षयला 2012 मध्ये स्टारडस्टचा सर्वोत्कृष्ट विनोदी,रोमँटिक अभिनेता म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

सन 2013 मध्ये अक्षयला हाऊस फुल 2, ओ माय गॉड आणि राउडी राठोर या चित्रपटांमधील भूमिकांसाठी स्टारडस्टचा स्टार ऑफ द इयर ने गौरविण्यात आले होते.

रुस्तुम हा अक्षयचा आणखी एक चांगला चित्रपट आहे. या चित्रपटामधील भूमिकेसाठी त्याला 2017 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

जॉली एल एल बी 2 मध्ये सुद्धा अक्षय कुमारने उत्कृष्ट काम केले आहे. त्याकरिता त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा झी सिने पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

अक्षय कुमार हा हरहुन्नरी कलाकार आहे. त्याच्या अभिनयात विविधता आहे. त्याच्या अनेक चित्रपटांतून आपल्याला सहज लक्षात येईल. बऱ्याच चित्रपटांसाठी अक्षय कुमारला नामांकने मिळाली होती. त्याबाबत माहिती जाणून घेऊ या.

अक्षय कुमारला ये दिल्लगी,  दिल तो पागल है आणि मुझसे शादी करोगी, या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून नामांकन मिळाले होते.मुझसे शादी करोगी साठीच त्याला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून ही नामांकन मिळाले होते.

तर नमस्ते लंडन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळाले होते.

2011 पासून अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व पत्करले.

अक्षय कुमारने टी व्ही शो देखील होस्ट केले आहेत. खतरोके खिलाडी या शो मध्ये अक्षयने उत्कृष्ट संचालन केले आहे.

तुम्हाला आमचा akshay-kumar-biography-in-marathi हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्ही आमच्या http://www.historicaltouch.com या वेबसाईट ला पण भेट देऊ शकता.

संदर्भ – गुगल

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment