Orange Tree Plantation | Santra Pik Lagavad |संत्रा पिकाची लागवड

Orange Tree Plantation | Santra Pik Lagavad |संत्रा पिकाची लागवड

Orange Tree Plantation | Santra Pik Lagavad

महाराष्ट्रात विदर्भातील नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यात संत्रा Orange Tree Plantation | Santra Pik Lagavad हे पीक घेतल्या जाते. नागपूरची संत्री म्हणून पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. आजच्या या लेखात आपण संत्रा या पिकाची लागवड, त्याची व्यवस्थापन कसे करावे याबाबत सखोल माहिती घेऊ या.

संत्री या पिकासाठी हवामान कसे असावे ?

तज्ज्ञांच्या मते संत्री या पिकासाठी 13 ते 37 अंश सेल्सिअस तापमान उत्तम राहते. मुळात या पिकासाठी उष्ण आणि थोडे दमट हवामान आवश्यक असते. सुमारे 370 मिली मीटर पाऊस आणि हवेची आद्रता 50 ते 53 टक्के असल्यास या पिकाची वाढ जोमदार होते.

संत्री या पिकासाठी जमीन कशी असावी ?

संत्र्याच्या पिकासाठी जमीन ही पाण्याचा निचरा होणारी आवश्यक असते. मध्यम प्रमाणात काळी जवळपास 1 ते 1.5 मीटर खोलीची जमीन असावी. मातीमध्ये थोड्या प्रमाणात मुरूम, वाळू किंवा चुनखडी असल्यास चालते. जमिनीचा आम्ल निर्देशांक 5.5 ते 7.5 असल्यास उत्तम. जमीन जर जास्त प्रमाणात पाणी धरून ठेवणारी असेल तर संत्राच्या झाडाची मुळे सडून जाऊ शकतात.

संत्री पिक लागवणीसाठी पूर्वमशागत कशी करावी ?

सर्वप्रथम जमिनीची नांगरणी करणे आवश्यक आहे. जमिनीची खोलवर नांगरणी करून घ्यावी. शेतात असलेली वनस्पती, काडी-कचरा, मुळ्या ह्या अगोदर वेचून घ्याव्या. शेत जमीन जर सपाट नसेल तर ती अगोदर सपाट करून घ्यावी. वखरणी करून जमीन भुसभुशीत करून घेणे आवश्यक आहे.

संत्री लागवणीसाठी कलमांची निवड कशी करावी ?

जेव्हा संत्री पिक घ्यायचे ठरल्यावर कलमांची निवड अचूकपणे करणे आवश्यक आहे. कलमांची निवड करत असतांना जी कलमे शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली आहेत त्यांचीच निवड करावी. शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली कलमे निरोगी, जोमदार वाढणारी, जम्बेरी, खुंटावर डोळे भरलेली असावी. शक्यतो डोळे भरून तयार केलेल्या कलमांपासूनच संत्र्याची लागवण करणे फायदेशीर ठरते. त्यामुळे संत्र्याची कलमे ही कृषी विद्यापीठे आणि शासकीय रोपवाटीकेतूनच खरेदी करून घ्याणे आवश्यक आहे.

संत्र्याच्या जाती :

संत्रीच्या नागपूर संत्री, किन्नो संत्री आणि न. १८२ या जाती आहेत.

संत्री पिकाच्या लागवडीची तयारी कशी करावी ?

Orange Tree Plantation | Santra Pik Lagavad

संत्री पिकाची प्रत्यक्ष लागवण करण्याच्या एक महिना अगोदर खड्डे खोदून घ्यावे. हे खड्डे 6 * 6 मीटर अंतरावर ६० * ६० से.मी. आकाराचे चौरस पद्धतीचे हे खड्डे असणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी या खड्ड्यात जवळपास २५ किलो चांगल्या प्रकारे कुजलेले शेणखत टाकावे. त्यात आणखी दोन किलो सिंगल सुपर फोस्फेट  आणि १०० ग्राम क्लोरडेन वा ओल्ड्रीनची पावडर टाकावे. जर गाळाची माती त्यात टाकली तर खूपच छान.

वरीलप्रमाणे सर्व तयारी केल्यानंतर मान्सूनचा जवळपास ३ ते ४ वेळा पाऊस पडून झाल्यावर तसेच जमिनीत योग्य प्रमाणात ओल गेल्यावर कलमांची लागवण त्या खड्ड्यात करावी. कलमांची लागवण करतांना शक्यतो संध्याकाळी वा आकाश ढगाळलेले असतांना करावी आणखी एक काळजी घ्यावी.

कलमांचा डोळा कोणत्या दिशेने ठेवणे फायदेशीर ठरते ते ही बघू या. तर लागवण करतांना कलमांचा डोळा पश्चिम वा दक्षिण दिशेला ठेवावा. यामागील कारण असे कि, जोरदार हवेमुळे कलमांचा डोळा खचण्याची शक्यता असते.

कलम खड्ड्यात ठेवल्यावर कलमेचे मूळ व्यवस्थित ठेवून त्यावर माती सावकाक्ष टाकावी. माती घट्ट दाबू नये. जर माती दाब देऊन टाकल्यास कलमांची तंतुमुळे तुटण्याची शक्यता असते. कलमांच्या खालच्या भागातील पाने तोडून टाकावी. कलमांची लागवड झाल्यावर अंदाजे एक लिटर पाणी देणे ठीक राहील.

हे ही वाचा : गहू लागवड कशी करावी?

संत्री पिकास पाणी कसे आणि किती द्यावे ?

सर्वसाधारणपणे संत्र्याच्या झाडांना वर्षाकाठी २४ ते २५ ओलिताच्या पाळ्या देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात जशी आवशक्यता भासेल तसे ओलीत करावे. हिवाळ्यात आठ ते दहा दिवसांच्या अंतराने ओलीत करावे. तर उन्हाळ्यात सहा ते सात दिवसांच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत देण्यासाठी गोलाकार पद्धतीने आळे तयार करावे. आळ्याच्या बाहेरील भागापासून पाणी देत यावे. झाडाची मुळे दूरवर पसरलेली असतात आणि खोडाला पाणी लागत नाही. खोडाला पाणी लागल्यास झाडाला डिंक हा रोग लागून झाड खराब होऊ शकते.

संत्रा पिकासाठी खत व्यवस्थापन कसे करावे ? Orange Tree Plantation | Santra Pik Lagavad

संत्र्याच्या झाडाला त्याच्या वयानुसार खत द्यावे लागत असते. साधारणता एक वर्ष्याच्या झाडास शेणखत पाच किलो द्यावे. नत्र १२० ग्राम  तर स्फुरद साठ ग्राम देणे आवश्यक आहे. दोन वर्ष्याच्या झाडास दहा किलो शेणखत द्यावे. २४० ग्राम नत्र तर स्फुरद १२० ग्राम देणे गरजेचे आहे. तीन वर्षे झालेल्या झाडास १५ किलो शेणखत द्यावे. ३६० ग्राम नत्र तर १८० ग्राम स्फुरद द्यावे. चार वर्ष्याच्या झाडास वीस किलो शेणखत द्यावे. तर ४८० ग्राम नत्र आणि २४० ग्राम स्फुरद द्यावे. पाच वर्षे झालेल्या झाडास २५ किलो शेणखत द्यावे. नत्र ६०० ग्राम तर स्फुरद ३०० ग्राम द्यावे. सहा ते नऊ वर्ष्याच्या झाडास ३० ते ५0 किलो शेणखत द्यावे. नत्र ७२० ते १००० ग्राम तर स्फुरद ३६० ते ५०० ग्राम द्यावे. दहा आणि त्यापेक्षा जास्त वय झालेल्या झाडास ५० किलो शेणखत द्यावे. नत्र १००० ग्राम द्यावे.

शेणखत हे साधारणता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात द्यावे. रासायनिक खते जुलै, सप्टेबर आणि फेब्रुवारी या महिन्यात समान तीन हिस्से करून द्यावे. माती परीक्षण करून गरजेनुसार आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार खत द्यावे.

संत्रा पिकावरील रोग :

सामान्यता संत्र्याच्या झाडावर डिंक्या, खैरा, शेंडा सुकणे, फळ कुजणे, सल आणि कीड याप्रकारचे रोग येतात.

डिंक्या रोग :

डिंक्या रोग फायटोफ्थोरा या जातीच्या कवकामुळे होतो. झाडाच्या बुंध्याजवळ झालेल्या जखमातून वा कलमेच्या डोळ्यातून कवकाचा संसर्ग होऊन त्यातून डिंक बाहेर पडतो. त्यामुळे झाडाची साल निघून लाकूड उघडे पडते. त्यामुळे झाड काही दिवसांनी मरते.

जंबूरीचे झाड डिंक्या रोगास प्रतिकार करते. त्यामुळे जंबूरीच्या रोपाचा डोळे भरून कलमे तयार करणे केव्हाही चांगले असते. हे डोळे जमिनीपासून २३ ते २४ सेमी उंचीवर भरणे चांगले असते. कलमेच्या बुंध्याशी मातीचा उंचावटा करावा. त्यामुळे झाडास पाणी देतांना खोडास पाणी लागत नाही. ज्या ठिकाणी डिंक धरला आहे त्या ठिकाणी धारदार आरीने तो भाग तासून टाकावा. 0.१ टक्का पारायुक्त कवक नाशकाची बोर्डोमिश्रण लावावे.

झाडाची पाने गळणे आणि फळ कुजणे : Orange Tree Plantation | Santra Pik Lagavad

फायटोफ्थोरा याच कवकामुळे झाडाची पाने गळतात आणि फळे कुजतात. झाडाच्या कोवळ्या शेंड्यांना रोगाचा संसर्ग होऊन त्यांचा रंग तपकिरी होतो. फळे मऊ होऊन कुजतात आणि गळून पळतात. झाडावर बुरशीचा थर चढतो. एप्रिल ते जुलै या तीन महिन्यात बोर्डोमिश्रणच्या तीन फवारण्या कराव्या.

खैरा :

या रोगात झाडाची पाने , फळे तसेच झाडाचा शेंडा  तपकिरी रंगाचा होतो. सूक्ष्मजंतूमुळे हा रोग होतो. पावसाळ्यात या रोगाची वाढ होते. ज्या फांद्यांवर हा रोग पसरला आहे त्यांची पावसाळ्यापूर्वी छाटणी करून घ्यावी तसेच तामयुक्त बुरशीनाशक फवारावे.

झाडाचा शेंडा सुकणे :

हा रोग मुख्यता झाडाच्या कोवळ्या फांद्यांवर येतो. पानावर तपकिरी, पांढरे ठिपके पडतात. पाने, फुले आणि कोवळी फळे गळून पडतात. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात रोग चढलेल्या फांद्यांची छाटणी करून घ्यावी. झाडांना शेणखत घालावे आणि बोर्डोमिश्रण आणि फेरस सल्फेट यांचे मिश्रण करून त्याची फवारणी करावी.

 संत्रा पिकावरील कीड कशी दूर करावी ?

लिंबूवर्गीय फळांत कीड पडत असते. आपल्या विदर्भात हा रोग प्रामुख्याने आढळतो. कीड लागून लहान फळे, फुले सुकून जातात. लहान शेंडे सुकून जातात. कीडमुळे झाडावर काळी बुरशी वाढते. झाडांना फळे लागत नाहीत. झाड सुकून जाते.

कीडसाठी पॅराथिऑन, मॅलॅथिऑन आणि निकोटीन सल्फेट फुले येण्याच्या आधी आठवड्याच्या अंतराने तीन वेळा फवारणी करावी.

याशिवाय पांढरी माशी, फळातील रस शोषणारा पतंग,मावा, खवले कीटक,गुलाबी रोग असे आणखी रोग संत्र्याच्या झाडावर पडतात. वेळीच तज्ञांच्या सल्ल्यानुसार यावर उपाययोजना करावी. मग भरघोस पिक येणारच.

तुम्हाला आमचा Orange Tree Plantation | Santra Pik Lagavad हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्ही आमच्या http://www.historicaltouch.com या website ला भेट देऊ शकता.

संदर्भ : गुगल

Leave a Comment