Lonavala Tourist Places In Marathi 2022 | लोणावळ्यातील पर्यटन स्थळे

Lonavala Tourist Places In Marathi 2022 | लोणावळ्यातील पर्यटन स्थळे

Lonavala Tourist Places In Marathi 2022
source : tripadvisor.in

महाराष्ट्रातील भूमीत अनेक पर्यटन स्थळे आहेत. सह्याद्री आणि सातपुड्याच्या सानिध्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. महाराष्ट्राच्या या निसर्गरम्य भूमीत क्षणभर विश्रांतीसाठी पर्यटक दूरदुरून येत असतात. आजच्या या लेखात आपण महाराष्ट्रात असेच एक प्रसिद्ध असलेले आणि पर्यटकांच्या आवडीचे असलेले लोणावळा (Lonavala Tourist Places In Marathi 2022) या पर्यटन स्थळाबाबत माहिती जाणून घेऊ या.

लोणावळा हे पुण्यापासून 64 किमी तर मुंबईपासून 96 किमी अंतरावर आहे.   भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण देणारे केंद्र आयएनएस शिवाजीचे मुख्यालय लोणावळ्यात आहे.

लोणावळा हे मुंबई पुणे महामार्गावर आहे. हे पर्यटन स्थळ समुद्रसपाटीपासून सुमारे 625 मीटर उंच आहे. महाराष्ट्राची शान असलेल्या सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील लोणावळा हे एक उत्कृष्ट थंड हवेचे ठिकाण आहे.

सह्याद्रीच्या कुशीत असल्याने लोणावळा या ठिकाणी विपुल प्रमाणात वनराई आहे. उंच कडे, खोल दऱ्या, भरगच्च वनराईने असलेले डोंगरमाथे, पावसाळ्यात उंच पर्वतांवरून कोसळणारे धबधबे पर्यटकांचे चित्त आकर्षित करून घेते. त्यामुळेच लोणावळा हे नेहमी पर्यटकांनी गच्च भरलेले असते.

हे ही वाचा : कुल्लू मनाली पर्यटन स्थळ 

लोणावळ्यापासून जवळच मळवलीवरून सुमारे दहा किमी अंतरावर कार्ले आणि भाजे या सुप्रसिद्ध लेण्या आहेत. कार्लेजवळील टेकड्यांवर असलेला ड्युक्स नोज हा पॉइंट ट्रेकिंगसाठी आव्हानात्मक आहे. तर लोणावळ्यापासून जवळपास दोन किमी अंतरावर कैवल्यधाम हा आश्रम आहे. या आश्रमात योगिक उपचार तर केले जातातच सोबत योग प्रशिक्षण आणि संशोधनही केले जाते.

खंडाळा हे महाराष्ट्रातील आणखी एक सुप्रसिद्ध थंड हवेचे ठीक आहे. खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण लोणावळ्यापासून अगदी पाच किमी अंतरावर आहे.

लोणावळ्यापासून जवळ असलेल्या मळवलीपासून लोहगड, विसापूर आणि तिकोना हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे असलेले किल्ले जवळ आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणी इतिहासप्रेमी आणि ट्रेकर्स यांची वर्दळ नेहमी असते.

महारष्ट्रातील या प्रसिद्ध थंड हवेच्या पर्यटन स्थळी कोणकोणती पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत त्याबाबत सविस्तर माहिती घेऊ या.

लोणावळ्यातील मुख्य पर्यटन स्थळे : Lonavala Tourist Places In Marathi 2022

Lonavala Tourist Places In Marathi 2022
source : holidify.com

भुशी धरण :

भुशी धरण हे पावसाळ्यात लोणावळ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. भुशी धरण लोणावळ्यापासून जवळपास आठ किमी अंतरावर आहे. इंद्रायणी नदीवर हे धरण आहे. या ठिकाणी असलेला धबधबा आणि भुशी धरणाच्या पायऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्यात चिंब ओले होण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही.

भुशी धरणाला भेट देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. या धरणाला भेट देण्याची वेळ सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत आहे.

कार्ला लेणी :

कार्ला लेणी लोणावळ्यापासून जवळपास बारा किमी लांब आहे. ही लेणी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात निर्माण केलेली आहे.या ठिकाणी असलेला अतिकठीण बेसाल्ट खडक फोडून या लेणीचे निर्माण झाले आहे.

कार्ले लेणीच्या ठिकाणी सत्याग्रह आणि एकविरा देवीचे मंदिर आहे. या लेणीच्या आत अतिक्षय सुंदर असे नक्षीकाम केलेले असते.

अखंड खडकात कोरलेला विजयस्तंभ चैत्यगृहाच्या बाहेर आहे. चैत्यगृहाच्या बाहेरील भिंतीवर स्त्री-पुरुष आणि हत्ती यांच्या मुर्त्या आहेत. त्यावर सुंदर असे नक्षीकाम केलेले आढळून येते. या लेणीच्या आत बौद्ध भिक्कुंसाठी निवासासाठी खोल्या आहेत.

कार्ले लेणी बघण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जाते. भारतीय पर्यटकांसाठी तीस रुपये शुल्क आहे. तर परदेशी पर्यटकांसाठी तीनशे रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते.

लेणी बघण्यासाठी वेळ सकाळी नऊ ते पाच आहे.

भाजे लेणी :

लोणावळ्याजवळ असलेल्या भाजे लेणी हे देखील इतिहासाची आवड असणाऱ्या पर्यटकांचे एक पसंतीचे पर्यटन स्थळ आहे. लोणावळ्याजवळ असलेल्या मळवलीच्या रेल्वे स्टेशनच्या दक्षिण बाजूला भाजे लेणी आहे.

भाजे लेणीमध्ये एक चैत्यगृह आणि बारा विहार आहेत. या लेण्यात सूर्यनारायण आणि इंद्र या देवतांच्या मुर्त्या आहेत. येथील सूर्य लेणी ही त्या ठिकाणी केलेल्या कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहे.

भाजे लेणीचे निर्माण कार्य सुद्धा इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात केलेले आहे. कार्ले आणि भाजे या लेण्या बघण्यासाठी वर्षभरात केव्हाही जाता येते.

राजमाची पॉइंट :

लोणावळ्याजवळ असलेल्या खंडाळ्याच्या घाटात मुंबई – पुणे जुना हाय वे वर हा राजमाची पॉइंट आहे. राजमाची पॉइंट हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. राजमाची पॉइंट म्हणजे मावळातील राजमाची हा ऐतिहासिक किल्ला होय. मावळातील निसर्ग या ठिकाणाहून आपल्याला बघता येतो. सह्याद्रीच्या पर्वत रांगांचे मनमोहक दृश्य आपले चित्त आकर्षित करून घेते. पर्वतांवरून पडणारे धबधबे, ती हिरवीगार वनराई बघता मन अगदी खुश होऊन जाते. या ठिकाणाहून सुंदर निसर्गाचे फोटो काढता येतात.

लॉयन्स पॉइंट :

लोणावळ्यापासून सुमारे बारा किमी अंतरावर हा पॉइंट आहे. या ठिकाणी पावसाळ्यात खूप छान निसर्गाचा आस्वाद घेता येतो. पावसाळ्यात वाहणारे छोटे छोटे झरे, नाले, उंचावरून पडणारे धबधबे बघता मन मंत्रमुग्ध होऊन जाती.

येथील निसर्गामुळे या पॉइंटला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे.

टायगर पॉइंट वा टायगर लीप :

लोणावळ्याहून अँबी व्हॅलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या कुरवडे या गावाच्या लगत हा टायगर पॉइंट वा टायगर लीप आहे. या पॉइंटवरचे दृश्यही चित्तवेधक आहे. या ठिकाणी असणारे उंचच उंच जाणारे सुळके पाहून आपण नक्कीच थक्कच होऊन जातो. या पॉइंटवरही  झरे, धबधबे आहेत. त्यामुळे या ठिकाणीही निसर्गप्रेमी पर्यटकांची नेहमीच खूप मोठ्या संख्येने वर्दळ असते.

सुनील व्हॅक्स म्युझियम :

लोणावळ्यात नव्यानेच सुरु झालेले सुनील व्हॅक्स म्युझियम हे आता पर्यटकांचे खास आकर्षण स्थळ ठरले आहे. या व्हॅक्स म्युझियमध्ये सेलिब्रेटींचे मेणाचे हुबेहूब दिसणरे पुतळे ठेवले आहेत.

जगभरातील सेलिब्रेटींचे यामध्ये खेळाडू, अभिनेते, राजकारणी हुबेहूब दिसणरे पुतळे या सुनील व्हॅक्स म्युझियममध्ये आहेत.

सुनील व्हॅक्स म्युझियमला भेट देण्यासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत वेळ आहे. प्रवेश शुल्क दीडशे रुपये आहे.

इमॅजिका थीम पार्क :

इमॅजिका थीम पार्क हे लोणावळ्यापासून सुमारे 27 किमी अंतरावर आहे. हे पार्क लहान थोरांपासून सर्वांचेच आकर्षणाचे स्थळ आहे. वाटर पार्क, स्नो पार्क आणि थीम पार्क या ठिकाणी आहेत. विविध प्रकारच्या water activities या पार्कमधील पर्यटकांचे खास आकर्षण आहे. त्या ठिकाणी हौसी पर्यटक भरपूर enjoy करू शकतात.

पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क 900 रुपये इतके आहे.

कामशेत पॅराग्ल्यायडिंग बंजी जम्पिंग :

लोनावाल्यामध्ये साहसी खेळांची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी पॅराग्ल्यायडिंग बंजी जम्पिंगची सुविधा आहे. लोणावळ्यात पॅराग्ल्यायडिंग करण्यासाठी जवळपास 2500 ते 5000 रुपये लागतात. हे बंजी जम्पिंग जमिनीपासून सुमारे 150 फुट उंचीवर आहे.

पवना लेक कॅम्पिंग :

पवना लेक कॅम्पिंगला तुम्ही नेहमीच्या जीवनातून चेंज म्हणून भेट देऊ शकता. या पवना लेक कॅम्पिंगजवळ music dance देखील आहे. पर्यटकांचे हे खास आकर्षण आहे.

पवना लेक कॅम्पिंगवर तुम्ही रात्रीला टेंट किरायाने घेऊन मुक्काम करू शकता. एका रात्रीचा किराया 1000 रुपये जेवण आणि नाश्त्यासह आहे.

कुणे वाटर फॉल लोणावळा :

लोणावळ्यातील सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगांवरून पडणारे धबधबे पर्यटकांचे खास आकर्षण आहेत. खंडाळ्याजवळील कुणे या गावात असलेला कुणे वाटर फॉल हा भारतातील सर्वात उंच धबधब्याच्या यादीत 14 व्या क्रमांकावर आहे.

कुणे वाटर फॉल हा 100 मीटर उंच आहे. हा धबधबा मुंबई – पुणे हाय वे आठ किमी अंतरावर आहे.

लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला केव्हा जावे ? Best Time To Visit Lonavala Hill Station :

महाराष्ट्रातील या प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची असेल तर सर्वात उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च ही आहे. पावसाळ्यानंतर लोणावळ्यातील  बहरलेला निसर्ग बघण्यासाठी हा वेळ निशितच उत्तम आहे.

लोणावळ्यातील विविध प्रकारचे प्रेक्षणीय स्थळे आहेत त्याचा आनंद घेण्यासाठी नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून नक्कीच वेळ काढा.

लोणावळ्याला कसे जायचे ? How To Reach Lonavala By Road/Train/plane ?

लोणावळा Lonavala Tourist Places In Marathi 2022 हे थंड हवेचे ठिकाण मुंबई – पुणे हाय वे वर असल्याने त्या ठिकाणी पोचण्यासाठी भरपूर साधने आहेत.रोडने तुम्ही पुण्यावरून तळेगाव , खंडाळा, कर्जत मार्गे जाऊ शकता.महाराष्ट्र राज्य परिवहनच्या भरपूर बसेस उपलब्ध आहेत.

लोणावळा रेल्वे स्टेशन मुंबई – पुणे रेल्वे मार्गशी जोडलेले आहे. भारतातून कोठूनही तेथे जाऊ शकता.

भारतातून वा जगभरातून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यावर तेथून कॅब मिळू शकतात.

तुम्हाला आमचा Lonavala Tourist Places In Marathi 2022 हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

तुम्ही आमच्या http://www.historicaltouch.com या website ला भेट देऊ शकता.

संदर्भ : गुगल

Leave a Comment