नागपूर मधे किती तालुका आहे?www.marathihelp.com

नागपूर मधे किती तालुका आहे?
नागपूर जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तालुके आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रांतात असलेला नागपूर जिल्हा देशाच्या मध्यभागी स्थित आहे. नागपूर शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. नागपूर या प्रशासकीय विभागात नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे.
नागपूर जिल्हा हा एकूण 14 तालुक्यात विभागलेला आहे. ते तालुके या प्रमाणे आहेत: रामटेक, उमरेड, कळमेश्वर, काटोल, कामठी, कुही, नरखेड, नागपूर, नागपूर (ग्रामीण), पारशिवनी, भिवापूर, मौदा, सावनेर आणि हिंगणा. राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनाचा मामलेदार हा प्रमुख असतो. तो तालुक्याअंतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासकीय जबाबदार्‍या पार पडत असतो.

रामटेक – राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. रामटेक हे नागपूरच्या ईशान्येस सुमारे 54 किलोमीटर अंतरावर आहे. या नावाचा अर्थ “रामाचा डोंगर” असाच होतो. इ.स. 250 मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता.सातवाहनांच्या कालात प्रवरपूर (सध्याचे मनसर) हे एक महत्त्वाचे ठिकाण होते. जवळच, तोतलाडोह हे धरण आहे.रामटेकच्या दक्षिणेला असलेला वाकाटककालीन नगरधनचा किल्ला, त्यांची राजधानी होता. रामटेक परिसरात नुकताच पुरातन बौद्ध संस्कृतीचा शोध लागला आहे.

उमरेड – उमरेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद असलेले एक गाव आहे. उमरेडला हलबी समाजाची जमीन मानली जाते. हलबा हा समाज वेदकालीन भारतात वस्ती करून राहणारा मानतात. त्या समाजाचे कुलगोत्र विशिष्ट आहे. ती जमात सूर्याची उपासक. तो समाज मध्यप्रदेशात ‘हलबा’ तर महाराष्ट्रात ‘हलबी’ या नावाने ओळखला जातो. उमरेड करहंडला अभयारण्य हे नागपूरपासून 58 किमी अंतरावर आहे.

कळमेश्वर – हे एक औद्योगिक शहर असल्यामुळे देशातील विविध भागातून आलेले लोक इथे राहतात. धापेवाडा आणि अडसा हे दोन पर्यटनस्थळ प्रसिद्ध आहेत. कळमेश्वर MIDC परिसरात तब्बल 150 औद्योगिक प्रकल्प आहेत. नागपूरपासून केवळ 25 किमी अंतरावर असल्यामुळे हे नगर रस्ते आणि रेल्वे मार्गे जोडले गेले आहे.

काटोल – नागपूरच्या 14 तालुकांपैकी एक काटोल हा 9017 हेक्टर क्षेत्राचा तालुका आहे. यात 83 पंचायत गावांचा समावेश करण्यात आला आहे.

कामठी – कामठी तालुक्यात 48 पंचायत गावांचा समावेश केला आहे. काम्प्ती या नावाने ही या तालुक्याला ओळखले जाते.

कुही – उमरेड उपविभागाखाली असलेले हे नगर दोन उपनगर जोडून बनलेले आहे – 1) कुही आणि 2) भोजापूर. बिरार प्रांताच्या महसूल विभागाखाली याचा समावेश केला गेला आहे. हे नगर नाग नदीकाठी वसलेले आहे.

नरखेड – नरखेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. नरखेड तालुकयातील काही महतवाची गावे मोवाड,सावरगाव आणि जलालखेडा आहेत.जलालखेडा येथे जांब आणि वर्धा नदीचया संगमावर सोमेश्वराचे पुरातन मंदीर आहे.

नागपूर – नागपूर हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील तेरावे मोठे नागरी क्षेत्र (urban conglomeration) आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरास ‘संत्रानगरी’ असेही संबोधतात कारण शहरातील संत्री प्रसिद्ध आहेत व संत्र्याची मोठी बाजारपेठ येथे आहे. 2002 साली शहराचा 300वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

नागपूर (ग्रामीण) – नागपूर ग्रामीण विभागाखाली 100 पेक्षाही जास्त गावे सामील केली गेली आहेत.

पारशिवनी – पारशिवनी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका घनदाट जंगल, पहाड,टेकड्या,जलाशये अशा निसर्गरम्य गोष्टींनी व्याप्त असून,त्याचे क्षेत्रफळ 54250 हेक्टर आहे. या तालुक्यात सुमारे 117 गावे आहेत. या तालुक्यात, निसर्गसानिध्यामुळे अनेक पर्यटनस्थळे आहेत – पेंच प्रकल्पाचे धरण, कुंवारा भिवसन, गायमुख, हेमाडपंथी पुरातन देवालये, व्याघ्र प्रकल्प इ. नरहर ते घाटपेंढरी या घनदाट जंगलास नॅशनल पार्क घोषित करण्यात आले आहे.

भिवापूर – भिवापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका मिरचीच्या उत्पादनात आघाडीवर आहे. भिवापूर नाव हे तेथे असलेल्या भिमामातेच्या मंदिरावरून रूढ झाले. भिमापूर नावाचा अपभ्रंश भिवापूर असा झाला असा समज आहे. ह्या मंदिरात असलेल्या मातेच्या मूर्तीची स्थापना पाच पांङवांपैकी एक असलेल्या भीमाने केली म्हणून भिमा माता हे नाव पडले अशी आख्यायिका आहे.. दरवर्षी नवरात्रामध्ये ह्या ठिकाणी फार मोठी यात्रा भरते. आसपासच्या जिल्ह्यांतले लोक या यात्रेला येतात.

मौदा – बिरारच्या महसूल विभागात असलेला मौदा हा नागपूरचा एक तालुका आहे. सर्वात जवळ असलेले शहर म्हणजे नागपूर 30 किमी अंतरावर. तालुक्याखाली असलेले एकूण गाव 41 आहेत. NH-6 वर आणि कन्हान नदीकाठी वसले आहे.

सावनेर – सावनेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक गाव व सावनेर तालुक्याचे मुख्यालय आहे. येथे नगर परिषद असून हे गाव नागपूर पासून सुमारे 36 कि.मी. अंतरावर कोलार नदीच्या किनार्‍यावर वसलेले आहे.

हिंगणा – बिरारच्या महसूल विभागात असलेला हिंगणा हा नागपूरचा एक तालुका आहे. महाराष्ट्र राज्याच्या MIDC अंतर्गत असलेले औद्योगिक नगर म्हणून ओळखले जाते.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:42 ( 1 year ago) 5 Answer 3412 +22